उष्माघातामुळे बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

सोनपेठ - ताप मेंदूत गेल्यामुळे सहा महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) घडली. हा उष्माघाताचा प्रकार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

सोनपेठ येथील वसंत मारोती खेडकर यांची नात, गीता धनंजय डहाळे (रा. औरंगाबाद) यांची कन्या ऐश्वरी धनंजय डहाळे (वय सहा महिने) हिला दहा मे रोजी ताप आला. तिला परळीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप मेंदूत गेल्याने अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान ऐश्‍वरीचे निधन झाले.

Web Title: Child death due to heat stroke

टॅग्स