टिपरच्या धडकेत दोन मुले ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

औसा - जमालपूर (ता. औसा) येथून लातूरकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोन शाळकरी मुले भरधाव टिपरच्या धडकेत ठार झाल्याची घटना काल घडली. ही दोन्ही मुले शिकवणीसाठी लातूरला जात होती. दुर्घटनेनंतर टिपरचालक फरारी झाला होता; परंतु पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले आहे.

सेलू (ता. औसा) येथील सुदर्शन जाधव व अस्लम शेख ही दोन मुले आपल्या दुचाकीवरून जमालपूर रस्त्याने लातूरला जात असताना पुढून येणाऱ्या टिपरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व धडक देऊन पळून गेलेल्या टिपरसह (एमएच 24, जे 6825) चालक सदानंद ज्ञानोबा तेलंग (रा. नांदगाव, ता. चाकूर) याला अटक केली.

Web Title: child death by tipper dash

टॅग्स