Hingoli News : हिंगोलीमध्ये ३१ बालविवाह रोखले

महिला, बालविकास समितीला हिंगोली जिल्ह्यात सरत्या वर्षात मोठे यश
बालविवाह
बालविवाहSakal

हिंगोली : जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास समितीच्या वतीने पुरेपूर प्रयत्न चालविले जात आहेत. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षात ३१ बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे.जिल्हाधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माया सूर्यवंशी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, अनुराधा पंडित यांच्या पथकाने बालविवाह रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन यांच्या समन्वयाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बाल वयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलीचे शिक्षण देखील पूर्ण होत नाही. पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो.

लहान वयात लग्न गाठ केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागते. बालविवाह होऊ नये म्हणून समितीकडून जनजागृती केली जाते. ग्रामीण भागात लहान वयात विवाह होत असेल तर तातडीने माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री नंबर वर टाकली जाते त्यानुसार नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावात जाऊन शहानिशा केली जाते. मुलीचे वय तपासले जाते त्यानंतर दोघांना समज देऊन बालविवाह रोखला जातो.

बालविवाह
Parbhani News : देेशासाठी महाराष्ट्राचे अतुल्य योगदान ; संभाजी भिडे यांचे प्रतिपादन

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षात सुमारे ३१ बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये कळमनुरी तालुक्यात नऊ, हिंगोली तालुक्यात पाच, वसमत मध्ये नऊ, सेनगाव तालुक्यात चार, तर औंढा तालुक्यात चार असे मिळून ३१ बालविवाह रोखण्यात आले. यासाठी बाल संरक्षण कक्षातील सरस्वती कोरडे, ॲड. अनुराधा पंडित, सचिन पठाडे, रामप्रसाद मुंढे यांच्यासह ग्रामसेवक, गावातील सदस्य, अंगणवाडी सेविका यांच्या पुढाकाराने बालविवाह रोखण्यात आल्याने आता जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिक जागृत झाले आहेत.]

१८ वर्षाखालील मुलीचा व २१ वर्षा खालील मुलाचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. बालपणातील गर्भारपणामुळे आई व बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, बाळाची वाढ कमी होऊ शकते. त्यामुळे वय पूर्ण झाल्यानंतरच पालकांनी योग्य वेळ येताच विवाह करावा.

— माया सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com