शॉकिंग! नांदेडमधून लहान मुलांचे सेक्स व्हिडिओ अपलोड... राज्यातील दुसरा गुन्हा 

Nanded News
Nanded News

नांदेड : संबंध देशभर तरूणामध्ये विकृती वाढविणाऱ्या चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनिमयान्वये गुरूवारी (ता. सहा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील पुण्यानंतर नांदेडमध्ये हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.

भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी ७० टक्के पोर्नोग्राफी बघण्यासाठी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिल्याचे समोर येत आहे.

इंटरनेट सहज उपलब्ध असल्यामुळे पोर्नोग्राफीमुळे तरूण विकृत मानसिकतेचे शिकार होत असून त्यातून अत्याचारासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. पोर्नोग्राफीमार्फत अशा गुन्ह्यामध्ये वाढ होत असून बरेच आरोपी यात विधीसंघर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा

भारतात कायद्याने चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी असताना अनेक पॉर्न संकेतस्थळाद्वारे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात गुरूपेजसिंग, जैशनखान, मुकेश शर्मा आणि मारवान यमन यांचा सहभाग आहे. यांनी संगनमत करून ता. २४ आॅगस्ट २०१८ ते ता. चार मे २०१९ या काळात लहान मुलांचे लैंगीक शोषणाबाबतचे साहित्य, व्हिडीओ, फोटो असे फेसबुक, सोशल माध्यमातून प्रसिद्ध करून माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केला.

सायबर सेलच्या लक्षात आले

हे सायबर सेलच्या लक्षात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश आलेवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. याचा तपास पोलिस निरीक्षक संदिप शिवले करत आहेत.

हा गुन्हा अतिशय किचकट असल्याने व आॅनलाईन लिंक शोधणे अवघड असून मुख्य आरोपीपर्यंत पोहचण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे श्री. शिवले यांनी सांगितले. तसेच हा व्हिडीओ ज्या मोबाईलवरून अथवा लॅपटॉपवरून अपलोड झाला आहे. त्यानुसार युएलआरवरून संबंधतांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com