Children of endlife-Affected Farmers from Ardhapur Taluka Pay an Inspiring Visit to NDA
sakal
अर्धापूर - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम नुकताच पार पडला. भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुण्यजागर’ प्रकल्पातील अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची पुण्यातील जगप्रसिद्ध एनडीएला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.