केंद्र संचालकासह होणार 13 पर्यवेक्षकांवर कारवाई 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - सोयगाव तालुक्‍यातील गोंदेगाव येथे इयत्ता दहावीच्या गणिताच्या पेपरला शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याची घटना सोमवारी (ता. 11) समोर आली
होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही करून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सोमवारी दहावीचा गणिताचा पेपर होता. या वेळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने सोयगाव तालुक्‍यातील गोंदेगावच्या सरस्वती भुवन केंद्राला भेट दिली होती. या वेळी केंद्रात 110 छायांकित स्वहस्ताक्षरातील प्रती सापडल्या. याची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने हा अहवाल विभागीय मंडळाच्या सचिवांना दिला. अहवालातील नोंदीनुसार या केंद्रावर गणिताच्या पेपरला नोंदी केलेल्या 325 विद्यार्थ्यांपैकी 322 जण परीक्षा देत होते. या केंद्रातून पथकाला दोन पोती कोहिनूर गाईड, स्पार्क गाईड असे छापील उत्तराचे साहित्य सापडले; तसेच बाहेरून आलेल्यांचा मुक्त संचार होता. या सामुदायिक कॉपीमध्ये केंद्र संचालक, सहकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांचा समावेश असल्याचे आढळून आले. 
 

भरारी पथकांकडून कार्यवाहीचा परिणाम नाही 
विभागात आतापर्यंत अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकरण समोर आले आहेत. त्यावर भरारी पथकांनी कार्यवाही केली आहे. याचा फारसा परिणाम केंद्रांवर होत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस केंद्राच्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांच्या मदतीने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. प्रत्येक पेपरला कॉपीबाबतचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत.  


कॉपीमुक्तऐवजी "मुक्तपणे कॉपी! 
शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेअगोदर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र बहुतांश केंद्रांत कॉपीमुक्तऐवजी "मुक्तपणे कॉपी अभियान' राबविण्यात येत आहे. यात केंद्रसंचालक, पर्यवेक्षकच कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर तातडीने गोदेंगावचा केंद्र संचालक बदलला आसून, छायांकित कॉपी प्रत बोर्डाकडे देण्यात आली आहे; तसेच प्रसंगी उपस्थित असलेल्या 13 पर्यवेक्षकांची नावेही परीक्षा मंडळाला कळविण्यात आली आहेत. लवकरच बोर्ड त्यांना चौकशी समितीकडे बोलवून साक्ष नोंदवतील; तसेच प्रत्येकाचे हस्ताक्षर तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल; तसेच

याबाबत संस्थेला कळविले असून, संस्थास्तरावर संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. 
- बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com