सिडको, हडकोत दोन दिवसांआडच पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद - पदाधिकारी, नगरसेवकांना विश्‍वासात न घेता सिडको-हडकोचा पाणीपुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्याचा परस्पर निर्णय घेतल्याबद्दल शनिवारी (ता. पाच) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली. सुमारे अडीच तास पाण्यावर चर्चा झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिडको-हडकोला पूर्वीप्रमाणे दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

प्रशासनाने दोन वेळा दोन दिवसांआड, तर तिसऱ्या वेळी तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केली. राजेंद्र जंजाळ यांनी ‘जखम पायाला अन्‌ मलम डोक्‍याला’ असे काम प्रशासन करीत असल्याचा आरोप केला. प्रशासन बेकायदा नळांवर कारवाई करीत नाही. पाणी कमी देता तर पाणीपट्टी कमी करणार का? अशा प्रश्‍नांचा भडिमार नगरसेवकांनी केला. महापौर घोडेले यांनी कुणाच्या अधिकाराने एक दिवसानी पाणीपुरवठा वाढवला, याचा चोवीस तासांत लेखी खुलासा सादर करावा, अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा निपटारा, जलवाहिन्यांची गळती बंद करा, पाणीपुरवठा विभागाला आवश्‍यक मनुष्यबळही उपलब्ध करून द्या, असे आदेश दिले. 

बेकायदा नळधारकांविरुद्ध मोहीम 
शहरात सुमारे सव्वालाख नळ कनेक्‍शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले. त्यापैकी किमान ५० हजार नळ हे व्यावसायिक असावेत. हे नळ नियमित केल्यास ५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, असे राजू शिंदे म्हणाले. उपमहापौर विजय औताडे यांनी खासगी एजन्सीमार्फत बेकायदा नळांवर कारवाई करण्याची सूचना केली. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अनधिकृत नळधारकांवर कारवाई करण्याचे महापौरांनी आदेशित केले.

एमआयएम-सेना, भाजपमध्ये बाचाबाची
एमआयएमचे विकास एडके यांनी सिडकोच्या पाणीपुरवठ्याचा पुळका. नेहमी तेच ते... असे वक्‍तव्य केले. त्यामुळे सिडको-हडकोचे नगरसेवक संतप्त झाले. त्यावरून बाचाबाची झाली. एडकेंना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी प्रमोद राठोड यांनी केली, तर दोन्ही गटांतील नगरसेवकांनी महापौरांसमोर येऊन गोंधळ घातला.

Web Title: cidco hadco water supply