Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Shocking Incident in CIPET Hostel Mess: CIPET चिकलठाणा वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आणि मुंगळे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिनाभरात दहा वेळा अशा घटना घडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असून मेस व्यवस्थापनावर कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Sambhajinagar Hostel Mess 'Mess'

Sambhajinagar Hostel Mess 'Mess'

esakal

Updated on

चिकलठाणा: गेल्या महिनाभरात ‘सिपेट’च्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नाश्ता, जेवणात दहा वेळेस अळ्या, मुंगळे निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी वारंवार याबाबत तक्रारी केल्या.

तरीही मेसचालकावर काहीही कारवाई झाली नाही. वारंवार केवळ ‘तंबी दिली’ एवढेच उत्तर प्रशासनाकडून मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com