esakal | वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन 
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

राष्‍ट्रीय व सामाजिक जबाबदारी म्‍हणून महामारीमध्ये एक महिण्याची सेवा देणार असून त्‍याबदल्यात मार्च महिण्यातील श्री. चिचोलकर यांचे एक महिण्याचे वेतन पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंड (कोरोना) साठी देणार आहेत. तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्‍यांचे मार्च महिण्याचे सर्वांचे मिळून एकून पन्नास दिवसांचे वेतन हे राष्‍ट्रीय रिलिफ फंडासाठी देणार आहेत.

वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सध्या जगभर कोरोना महामारी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्‍याचा भारतीय अर्थव्यवस्‍थेवर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच यात बळि पडलेल्या नागरिकांच्या सोईसुविधा व उपचारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी शासनास मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे येथील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ८१ दिवसांचे वेतन पंतप्रधान रिलिफ फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

या बाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शुक्रवारी (ता.२७) पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली. सर्व कर्मचाऱ्यांची नावे देखील देण्यात आली आहेत. राष्‍ट्रीय व सामाजिक जबाबदारी म्‍हणून महामारीमध्ये एक महिण्याची सेवा देणार असून त्‍याबदल्यात मार्च महिण्यातील श्री. चिचोलकर यांचे एक महिण्याचे वेतन पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंड (कोरोना) साठी देणार आहेत. 

हेही वाचाहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

पोलिस अधीक्षक यांच्याकडे विनंती

तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्‍यांचे मार्च महिण्याचे सर्वांचे मिळून एकून पन्नास दिवसांचे वेतन हे राष्‍ट्रीय रिलिफ फंडासाठी देणार आहेत. श्री. चिंचोलकर यांचे एक महिण्याचे व कर्मचाऱ्याचे पन्नास दिवसाचे वेतन कपात करून पंतप्रधान राष्‍ट्रीय रिलिफ फंडात (कोरोना) जमा करावे, अशी विनंती पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यात आनंदराव मस्‍के, किरण चव्हाण, साहेबराव जाधव, शेषराव राठोड, रावसाहेब घुमनर, सुरेश आडे, रवि गंगावणे, वसंत चव्हाण, फुलाजी सावळे, गजानन राठोड, सुभाष घुगे, शिवाजी पारसकर, गजानन सांगळे, रमेश ठोके, विकास गवळी, बळिराम शिंदे, तानाजी खोकले, अमित मोडक, गजानन राठोड, कैलास घुगे, चंद्रशेखर काशीदे, सुषमा भाटेगावकर, भारती दळवे यांचा समावेश आहे.       

सामान्य जनतेस मारहाण करू नका

जिल्‍ह्यात संचारबंदी सुरू असून बंदोबस्‍तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेस मारहाण करू नये, असे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता.२७) दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्‍यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्‍तासाठी तैनात आहेत. सदर बंदोबस्‍तातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य जनतेला मारहाण करीत आहेत. 

येथे क्लिक करा कळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड

अनुशासनात्‍मक होणार कारवाई

ही बाब गंभीर स्‍वरुपाची आहे. सामान्य जनतेला मारहाण केल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत झाल्यास आपणावर अनुशासनात्‍मक कारवाई करण्यात येईल, याची सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी नोंद घ्यावी, निष्काळजीपणा होणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिले आहेत. 

loading image