Hingoli News : हिंगोलीतील नागरिकांना मिळणार मोफत ई-शिधापत्रिका

कार्यवाही अखेरच्या टप्प्यात, लाभार्थ्यांचा वेळ वाचणार, आर्थिक पिळवणूक थांबणार तील
Hingoli
Hingolisakal

हिंगोली : शिधापत्रिका काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात, त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने राज्य सरकारकडून मोफत रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, तालुक्यात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत. त्यांना ई-शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शिधापत्रिकांएवजी ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका आता इतिहासजमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतर्गत धान्य दिले जाते. अनेक कुटुंबे हे कामधंद्यानिमित्त मूळ गावी राहात नाहीत. त्यांची शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असे. त्यांना धान्यही गावाकडील स्वस्त धान्य दुकानात मिळत. मात्र, हे कुटुंब गावी राहात नसल्याने धान्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नव्हते. शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.

स्वस्त धान्य दुकानारही बऱ्याचदा कुटुंबासाठी आलेल्या धान्य परस्पर काळ्या बाजारात विक्री करतात. या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली.बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती. बाराअंकी क्रमांकानंतर कोणत्याही दुकानात हाताचे.ठसे घेऊन धान्य घेता येत होते. गोरगरिबांना सण, उत्सव साजरे करण्यासाठी आनंदाचा शिधा १०० रुपयात दिला जातो. ज्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन केले आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता.

शिधापत्रिका काढून देताना काही दलाल नागरिकांची फसवणूक करतात. ते होऊ नये म्हणून आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्या नंतर त्याची पडताळणी होणार आहे. या ठिकाणी ही बनावट कागदपत्रे दाखल करता येणार नाहीत.

Hingoli
Hingoli : हिंगोलीसाठी ३३८ कोटींची मागणी ; जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक

शिधापत्रिकेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. सध्या आम्ही नागरिकांना ई-शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करीत आहोत.

— प्रविणकुमार धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

शिधापत्रिका किती एकूण शिधापत्रिका दोन लाख ४१ हजार ४००

  • अंत्योदय योजना २९ हजार ६७५

    प्राधान्य कुटुंब योजना ३७ हजार ९८

  • केशरी शिधापत्रिका१६ हजार ५६९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com