‘या’ शहराची महतीच न्यारी

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नांदेड ः गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडकर रस्त्यांच्या अत्यंत दयनिय अवस्थेला वैतागले आहेत. दोन-तीन शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजीची कामे केली. परंतु रस्ते दुरुस्त  होवून वर्षही उलटले नाही तोच शहरातील सिमेंट कॉक्रीटसह डांबरी मुख्य रस्त्यांवर थिगळ लावण्याची वेळ आलेली आहे. कोट्यवधींच्या मुख्य रस्त्यांवर थिगळ लावण्याची नामुष्की महापालिका आणि सार्वजनिक बांधकांम विभागावर आलेली आहे. अशा निकृष्ट व बेजबाबदार दर्जाच्या कामांमुळे शहरात सध्या कुठे खड्डे, कुठे चिखल, कुठे धुळ रस्त्यांवर दिसत आहे.

नांदेड ः गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडकर रस्त्यांच्या अत्यंत दयनिय अवस्थेला वैतागले आहेत. दोन-तीन शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजीची कामे केली. परंतु रस्ते दुरुस्त  होवून वर्षही उलटले नाही तोच शहरातील सिमेंट कॉक्रीटसह डांबरी मुख्य रस्त्यांवर थिगळ लावण्याची वेळ आलेली आहे. कोट्यवधींच्या मुख्य रस्त्यांवर थिगळ लावण्याची नामुष्की महापालिका आणि सार्वजनिक बांधकांम विभागावर आलेली आहे. अशा निकृष्ट व बेजबाबदार दर्जाच्या कामांमुळे शहरात सध्या कुठे खड्डे, कुठे चिखल, कुठे धुळ रस्त्यांवर दिसत आहे. तर कुठे प्रशासन आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट कारभाराची चुरी रस्त्यावर उघडी पडलेली दिसत आहे.  

सगळीकडे बोंबाबोंब

कोट्यवधी रुपये खर्च करुन शहरात तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या मुख्य रस्त्यांमध्ये लोकांना थोडेफार बरे वाटायला लागले होते. आपण शहरात राहतो याचा अनुभव लोकांना यायला लागला होता. पण तो फार काळ टिकला नाही. मागील वर्षी पाऊस कमी पडला म्हणून नाही तर हे सगळे अनुभव मागच्याच पावसाळ्यात नांदेडकरांना अनुभवायला मिळाले असते. कोट्यवधींच्या कॉंक्रीटच्या रस्त्यांवर खड्डे पडू शकतात ही बाब सामान्य नांदेडकरांच्या मनाला पटलेली नसली तरीही ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. आता या भ्रष्ट कारभाराची आणि निकृष्ट कामांची सगळीकडे बोंबाबोंब व्हायला लागल्यानंतर कोट्यवधींच्या रस्त्यांवर सिमेंटचे थिगळ लावण्याचे काम सध्या सुरु करण्यात आलेले आहे. 

आता सवय पडली

कामे तर निकृष्ट दर्जाची आहेतच शिवाय या कामांमध्ये कोणतेही नियोजन नाही. ज्या ठिकाणी रस्त्यांचे काम चालु आहे तेथे साधा फलक लावण्याची तसदी देखील ठेकेदार घेताना दिसत नाही. अधिकारीही त्यासाठी कोणतीही कारवाई करीत नाहीत. ठरलेले काम ठरलेल्या वेळेत पुर्ण करायचे असते ही तर जणू काही अंधश्रध्दाच आहे की काय असे नांदेडात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संथगतीने आणि बेजाबदारपणाने सुरु असलेल्या कामांकडे पाहून वाटते. नागरिकांनाही त्याची आता सवय पडली. 

‘‘रस्त्यांच्या बेजबादार कामांमुळे किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे कुठे खड्डे पडो, कुठे रस्त्यावर चिखल निर्माण होवो की रस्त्यावर चुरी पसरल्या जावो कुणी काहीही बोलणार नाही.  खड्ड्यांमधून वाहन काढतांना धडपडतील, रस्त्यावरील चिखलावरून वाहन चालवितांना अपघाताला सामोरे जातील; पण आवाज मात्र उठविणार नाही तेवढे समजदार आणि सहनशिल नागरिक ज्या शहरात राहतात त्या शहरात भ्रष्टाचाराशिवाय व निकृष्ट दर्जाच्या कामांशिवाय दुसरे होणार तरी काय?’’
- सिद्धेश्‍वर महाराज काकडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This city is unique, Know about Nanded