Society Election : सोसायटी निवडणुकीत दोन गटात हाणामारी

पाथरवाला बु. सोसायटी निवडणूक मतदान वेळीचा प्रकार
Clash between two groups in patharwala society elections polling time bjp shinde shivsena politics
Clash between two groups in patharwala society elections polling time bjp shinde shivsena politicssakal

पाथरवाला : अंबड तालुक्यातील राजेश टोपे यांच्या पाथरवाला बु या मुळ गावी दिनांक (01) शनिवार रोजी सकाळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व भाजपा शिंदे गटाची शिवसेनेचे समृद्धी ग्रामविकास पॅनल यांच्या मध्ये लढत आहे.

सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान मतदानावर आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिंदे गट शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले शिंदे गटांच्या कार्यकर्तोंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते कडुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत 753 मतदानापैकी 492 मतदान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली असुन पुढील मतदान प्रकिया शांततेत सुरू आहे.

मतदान केंद्रावर वृद्ध महिलेला मतदान करताना दिसत नसल्या कारणाने मतदानाचा अधिकार दुसऱ्याला देण्यावरून समोरच्या पार्टीने आक्षेप घेतल्याने थोडासा गोंधळ निर्माण झाला होता परंतु मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.

ऍड.संभाजी टोपे

पाथरवाला बु येथील सोसायटीच्या मतदान प्रक्रिया वेळी बोगस मतदान करणाऱ्याला रोखल्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 लोकांनी हाणामारी केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

शिवाजी मोरे समृद्धी पॅनलप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com