

POCSO Case Filed Against Classical Singer Newpurkar Over Student Complaint of Sexual Demand During Music Training Sessions
sakal
छत्रपती संभाजीनगर: शास्त्रीय संगीताचे शिक्षण देताना जवळीक साधणे, द्विअर्थी बोलणे, मद्याचा आग्रह करणे आणि शारीरिक संबंधाची मागणी आदी स्वरूपाची तक्रार विद्यार्थिनीने केल्यानंतर शास्त्रीय गायक आणि ‘ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स’चा संगीत शिक्षक सचिन नेवपूरकर (वय ४७, रा. शिवनेरीनगर) याच्याविरोधात येथील जवाहरनगर पोलिस ठाण्यात पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी त्याला सात नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.