स्वच्छ मुख अभियानात लातुरात जनजागृती फेरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

लातूर - येथील एमआयडीएसआर दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी (ता. 24) स्वच्छ मुख अभियानांतर्गत शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या फेरीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दातांची स्वच्छता व दातांचे विविध आजार टाळण्यासाठी राज्यभरात 23 ते 24 जानेवारीदरम्यान स्वच्छ मुख अभियान- 2017 राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच भाग म्हणून दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ही जनजागृती फेरी काढण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अमोल डोईफोडे यांच्या हस्ते फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, डॉ. साफल्य कडतणे, डॉ. विलास धुमाळ, डॉ. भागवत केंद्रे, डॉ.

लातूर - येथील एमआयडीएसआर दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी (ता. 24) स्वच्छ मुख अभियानांतर्गत शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या फेरीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दातांची स्वच्छता व दातांचे विविध आजार टाळण्यासाठी राज्यभरात 23 ते 24 जानेवारीदरम्यान स्वच्छ मुख अभियान- 2017 राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच भाग म्हणून दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ही जनजागृती फेरी काढण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अमोल डोईफोडे यांच्या हस्ते फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी उपप्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, डॉ. साफल्य कडतणे, डॉ. विलास धुमाळ, डॉ. भागवत केंद्रे, डॉ. स्नेहा खानापुरे, डॉ. सिकंदर पठाण, कार्यालय अधीक्षक बी. जी. दहिफळे यांची प्रमुख उपस्थिती होती. टाऊन हॉलपासून ही फेरी शिवाजी चौकमार्गे अंबाजोगाईरोडने दंत महाविद्यायात आली. दिवसातून दोन वेळा नियमितपणे मुख स्वच्छता करण्याचे आवाहन फेरीतून करण्यात आले. यासोबत धूम्रपान, तंबाखुजन्य पदार्थ, अमली पदार्थ व जंकफूडच्या अतिसेवनामुळे होणारे दुष्परिणाम व गंभीर आजार, दात नियमित स्वच्छ ठेवण्याची पद्धत, दात आणि हिरड्यांसंबंधीचे आजार, मुखाचा कर्करोग आदी विषयांवर फलकांतून व घोषणा देऊन जागृती करण्यात आली. फेरीसाठी तंत्रज्ञ संदीप भालेराव, सचिन देशमाने, संजय गुळभिले यांनी पुढाकार घेतला. फेरीत दंत महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्‍टर, विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. 

Web Title: Clean mouth round awareness campaign in latur