औरंगाबाद - कचऱ्यात आलेली तीन तोळ्यांची सोन्याची पोत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवून संबंधित महिलेला परत केली. या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सत्कार केला.
प्रभाग क्रमांक चारअंतर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक 28 मध्ये 26 जानेवारीला नेहमीप्रमाणे घंटागाडी ओला व सुका कचरा घेत निघाली. यावेळी मंजू प्रशांत गायकवाड यांची तीन तोळ्यांची सोन्याची पोत घंटागाडीमध्ये ओल्या कचऱ्यातून आल्याचे लक्षात आले. ही माहिती वॉर्ड अधिकारी अजमत खान, स्वच्छता निरीक्षक बी. जे. पाटील यांना कळविण्यात आली. त्यानंतर बचतगटामार्फत महापालिकेत काम करणारे जवान कडुबा वाघमारे यांनी सर्व कामगारांना एकत्र करून गाडीतील कचऱ्यात सोन्याची पोत शोधली. ती सापडल्यानंतर श्रीमती गायकवाड यांना महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ती परत करण्यात आली.
यावेळी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आयुक्त डॉ. निपुण विनायक, जवान कडुबा वाघमारे, भाऊसाहेब पठारे, मधुकर म्हस्के, वाहनचालक दळवी, सुरेंद्र भालेराव, सखाराम म्हस्के, रावसाहेब आढावे यांच्यासह कामगार उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.