Marathwada | मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, मात्र पाऊस नाही

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात २३ ते २६ मार्च दरम्यान वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता
ढगाळ वातावरण
ढगाळ वातावरण esakal

परभणी : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात २३ ते २६ मार्च दरम्यान वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असली, तरी पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) ग्रामीण कृषी हवामान (Weather) विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. परंतू २३ मार्चपासून हळूहळू तापमानाचा पारा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात (Marathwad) पुढील ४८ तासांत कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. (Cloudy Climate On Marathwada Region, But No Rain)

ढगाळ वातावरण
मेहुण्यावर ईडीच्या छाप्यानंतर मातोश्रीचे दरवाजे हलतायत, भाजपची ठाकरेंवर टीका

मराठवाड्यात पुढील ३ ते ४ दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सॅक, इस्रो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

ढगाळ वातावरण
लग्नाचे स्वप्न रंगवणाऱ्या मुलावर काळाची झडप, मुलगी पाहून परताना झाला अपघात

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त तर किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागाचे डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com