esakal | हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण; हळद काढणीस व्यत्यय

बोलून बातमी शोधा

हळद काढणी
हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण; हळद काढणीस व्यत्यय
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मागच्या दोन दिवसात सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या या वातावरणामुळे हळद काढण्यासाठी व्यत्यय आला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. बुधवारी हिंगोली शहरासह तालुक्यातील काही गावात तसेच औंढा नागनाथ तालुक्यात वादळी वारे मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले व त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा व ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तसेच ढगाळ वातावरण देखील होते.

हेही वाचा - पोलिसाच्या व्हिडिओने यंत्रणेला फोडला घाम; हिंगोली पोलिस दलातील अंमलदाराचा प्रताप

हिंगोली शहरासह तालुक्यातील बळसोंड, खांबाळा, कारवाडी तर औंढा तालुक्यातील अनेक गावात पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, गुरुवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सध्या काही शेतकरी हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. ढगाळ वातावरणामुळे व मेघगर्जना होत असल्याने हळद काढून ठेवलेल्या शेतकऱ्यांची हळदीचे ढिगारे झाकण्यासाठी धावपळ होत आहे. या वातावरणामे हळद काढणीच्या कामात व्यत्यय येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हळद काढणीची प्रक्रिया किचकट असल्याने सात ते आठ दिवस हळद काढणीस लागतात सध्या ही कामे सुरु आहेत. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा व्यत्यय येत असल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे