esakal | पोलिसाच्या व्हिडिओने यंत्रणेला फोडला घाम; हिंगोली पोलिस दलातील अंमलदाराचा प्रताप

बोलून बातमी शोधा

हिंगोली पोलिस
पोलिसाच्या व्हिडिओने यंत्रणेला फोडला घाम; हिंगोली पोलिस दलातील अंमलदाराचा प्रताप
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो छतावरुन उडी मारुन जीव देत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात त्या पोलिस कर्मचाऱ्याने एसपी साहेब माझी तात्काळ मदत करा, असे म्हणून माझे वडील देखील आजारी आहेत, जवळ एक रुपया नसून, कोणी नातेवाईक देखील जवळ नाहीत. मला दम्याचा त्रास असून पाहायला कोणी तयार नाहीत, उपचार देखील करण्यास कोणी पुढे येत नाही अश्या परिस्थितीत मी काय करावे असा प्रश्न पडला आहे. मी आपल्या दलातील अनेकांना फोन केला परंतू पुढे कोणी यायला धजावत नाही त्यामुळे मी छतावरुन उडी मारुन माझी जीवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - उन्हाच्या कडाक्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमधील पाणपोई झाली शोभेची वस्तू

कोरोना काळात रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची उपचाराअभावी असे हाल होत असल्याचे त्यातून समोर आले आहे. या रेकॉर्डिंगमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून कोविड सेंटरमध्ये मिळणाऱ्या उपचार पद्धतीवरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजय राऊत यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन त्या पोलिस कर्मचाऱ्यांला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे केला आहे. तर उपचार घेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव सचिन इंगोले असुन ते गोरेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे अॅड राऊत यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे