

‘Let the Farmer Choose His Bullock’: CM Issues Fresh Orders After Viral Video
esakal
सुशांत सांगवे
लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मदत म्हणून सरकारने उपलब्ध करून दिलेला बैल हा आजारी असल्याने सरकारवर विविध स्तरातून टीकेची झोड उडाली. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काशिनाथ गायकवाड यांना बाजारात नेणून त्यांना आवडेल तो बैल घेऊन द्या’, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना शुक्रवारी (ता. १२) दिल्या. त्यामुळे गायकवाड यांना लवकरच नवा बैल उपलब्ध होणार आहे.