#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोघांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बीड : मराठा समाजासाठी आपण आपले जीवन संपवित आहोत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, समाजाचा अंत पाहू नये असा मजकूर लिहून एकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी (ता.4) तालुक्यातील बेडुकवाडी येथे उघड झाली. तर दुसरी आत्महत्या डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे घडली.

बेडूकवाडी शिवारात शनिवारी सकाळी शिवाजी शिवाजी तुकाराम काटे (वय 42) यांचा गळफास लावलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या खिशात सापडलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत वरील मजकूर आढळून आला. दुसरी घटना डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे घडली. कानिफ दत्तात्रय येवले (वय ४५) यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली.

मराठा समाजाच्या आरक्षणासह मुलीचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने विष घेतल्याचे आपल्याला कानिफ यांनी सांगितले असा जबाब त्यांचे बंधू कल्याण येवले यांनी पोलिसांना दिला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह असून, कुटुंबियांना भरीव मदत आणि एकाला नोकरीत सामावून घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. 

Web Title: CM should not see the end of Maratha community Reservation should be given