

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंपर्क मोहीम राबविण्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्न थेट जाणून घेतले जाणार असून शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, लोकशाही संस्था आणि माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर पक्ष अधिक आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.