थंडीचा जोर वाढला, शहर पुन्हा गारठले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

औरंगाबाद - मागील दोन दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढला असून हा जोर आणखी दोन दिवस राहण्याची शक्‍यता आहे. थंडीच्या या कडाक्‍यामुळे सकाळी कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, बाजार समितीत भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना हुडहुडी भरत आहे. मागील आठवड्यात थंडीचा जोर वाढल्यानंतर पुन्हा कमी झाली होती. मात्र कालपासून (ता. 5) थंडीने पुन्हा जोर धरल्याने शहर पुन्हा गारठले आहे. शहरातील चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी (ता. 6) कमाल 29.3 तसेच किमान 12.0 अंश सेल्सिअसची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

Web Title: cold in aurangabad