नांदगांवपाटीजवळ शीतपेयाचा टेम्पो उलटला

प्रशांत शेटे 
शनिवार, 5 मे 2018

नांदगावपाटी (चाकूर) : शीतपेयाची वाहतूक करणारा टेम्पो नांदगांवपाटी (चाकूर) येथे पलटी झाल्याची घटना आज (शनिवार) घडली. यामध्ये जखमी झालेल्या चालकास मदत करण्याऐवजी टेम्पोतील शीतपेय लुटण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. काही अंतरावर महामार्ग पोलिस ठाणे असूनही ते घटनास्थळी कोणीही आले नाही. 

सोलापूरहून एम. एच. १३ ए. एक्स. ९२९८ क्रमांकाचा टेम्पो शीतपेय घेऊन चाकूरकडे निघाला होता. नांदगाव पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला यात असलेल्या शीतपेयाच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या होत्या. यावेळी टेम्पो चालकास मदत करण्याऐवजी शीतपेयाच्या बाटल्या घेऊन जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. 

रस्त्याने कार मधून जात असलेले काहीजण शीतपेयाच्या बाटल्या उचलून घेऊन जात होते. काही वेळानंतर शीतपेय कंपनीचे लातूर येथील सहकारी घटनास्थळी आले त्यांनी जखमी चालकास उपचारासाठी पाठविले. शीतपेय घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी पडली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

Web Title: coldrinks tempo accident