आयुक्तांनी भरविली शिक्षकांची शाळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी शनिवारी (ता. चार) थेट गरवारे स्टेडियमवर ४११ जणांची शाळा भरविली. प्रत्येकाने ता. २० ऑगस्टपर्यंत एक गोष्ट लिहून पाठवावी. त्यातील निवडक गोष्टी पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. 

महापालिका आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात वर्ग- तीनच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्याकडून सल्ले घेतले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांची एक समितीच स्थापन करण्यात आली आहे. त्यात शनिवारी सकाळी ११.३० वाजता शिक्षण विभागाच्या बैठकीचे आयोजन केले होते. महापालिकेत सुमारे साडेचारशे शिक्षक कार्यरत असून, त्यापैकी ४११ शिक्षक, मुख्याध्यापकांची शाळाच आयुक्तांनी गरवारे स्टेडियमवर भरविली. प्रत्येकी ३० शिक्षकांचा एक गट तयार केला. प्रत्येक गटात जाऊन आयुक्तांनी शिक्षणाची पद्धत कशी असली पाहिजे यावर भाष्य केले. गोष्टीच्या रूपाने विद्यार्थ्यांना शिकविल्यास ते लवकर लक्षात येते व विसरतदेखील नाहीत. त्यानुसार एका गटाने तीन उपगट करून यावर चर्चा करावी व त्यानंतर सूचना कोऱ्या कागदावर लिहून काढाव्यात, अशा सूचना केल्या. त्यानुसार शिक्षकांनी गटागटाने चर्चा केल्यानंतर सूचनाही लिहून काढल्या. बैठकीचा समारोप करताना त्यांनी प्रत्येक शिक्षकाने २० ऑगस्टपर्यंत एक गोष्ट लिहून माझ्याकडे पाठवावी. त्यातील निवडक गोष्टी शिक्षकदिनी ता. पाच सप्टेंबरला प्रकाशित करण्यात येतील, असे सांगितले. बैठकीला शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, समन्वयक संजीव सोनार, किशोर दांडगे यांची उपस्थिती होती.

Web Title: commissioner filled school teachers