Maratha Reservation : आरक्षणासाठी दोघांनी संपवले जीवन

मराठा आरक्षणासाठी वाघी-धानोरा (ता. जिंतूर) येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. गजानन लिंबाजीराव बोराडे (वय २५) असे त्याचे नाव आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation sakal

जिंतूर : मराठा आरक्षणासाठी वाघी-धानोरा (ता. जिंतूर) येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. गजानन लिंबाजीराव बोराडे (वय २५) असे त्याचे नाव आहे.

जिंतूर / िहंगोली ता. २० (बातमीदार) : मराठा आरक्षणासाठी वाघी-धानोरा (ता. जिंतूर) येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. गजानन लिंबाजीराव बोराडे (वय २५) असे त्याचे नाव आहे. गजानन हा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होत असे. ‘सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने होत नसल्याच्या नैराश्यातून जीवन संपवीत आहे’, असे हाता-पायावर लिहून त्याने शेतातील झाडाला गळफास घेतला. चारठाणा येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.

शेतात गळफास

माळसेलू (ता. हिंगोली)येथे तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) रात्री उघडकीस आली. विलास श्रीराम वामन (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास वामन हा पदवीधर असून काही दिवसांपासून तो एका खासगी दवाखान्यात काम करतो. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सक्रिय होता. काल दुपारी तो दुचाकीने वडिलांना कडती फाटा येथे सोडण्यासाठी गेला होता.

त्यानंतर तो घरी परतला नाही. रात्री घरी परतल्यावर वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला. कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री दहाच्या सुमारास त्याची दुचाकी शेतात आढळली. परिसरातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.

Maratha Reservation
Manoj Jarange : गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन, तरी कारवाया ; सगेसोयऱ्यांबाबतच्या मागणीवर ठाम

हिंगोली ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व विलासचा मृतदेह खाली काढला. त्याच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याच्या उल्लेखाची चिठ्ठी आढळल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com