वारे सरकार तेरा खेल, राफेल में जमाया मेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : 'गली गली में शोर है, चौकीदार चोर है!, नही चलेगी, नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी, वारे सरकार तेरा खेल, राफेल मे जमाया मेल' अशा जोरदार घोषणा देत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 12) जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन नऊ नोहेंबरला दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप नोटबंदीच्या धक्‍क्‍यातून सर्वसामान्य जनता, उद्योजक, व्यापारी बाहेर आलेले नाही.

त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात सोमवारी क्रांती चौकात जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली हातात फलक घेऊन जोरदार घोषणा देत सुमारे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नोटीबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. आंदोलनात शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, नितीन पाटील, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक सोहेल शेख, नवीद शेख, रवींद्र काळे, मिलिंद पाटील, किरण पाटील डोणगावकर, मुज्जफर खान, जीतसिंह करकोटक यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

Web Title: Congress agitation against BJP government