Loksabha 2019 : लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत

Machindra Kamat
Machindra Kamat

उदगीर : लातूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसने  शुक्रवारी (ता.२२) रात्री उशिरा मच्छिंद्र गुणवंतराव कामंत - कासराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कामत यांनी पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मुळचे कासराळ (ता. उदगीर) येथील रहिवाशी आसलेल्या कामंत यांचा पुण्यात सोलार, मसाल्याचा उद्योग आहे .वाणिज्य शाखेचे पदविधर आहेत. कामगार युनियनचे नेतृत्व केले आहे. त्यांनी २००९ ला उदगीर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाकडुन निवडणुक लढवली आहे. २०१४ ची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक होते.त्यांना राष्ट्रवादीने काॅग्रेस पक्षाने उमेदवारी देण्यात आली नव्हती .तरी पक्षात राहुन मतदार संघात संपर्क ठेवला होता, राष्ट्रवादीच्या नेतृवाकडुन दुर्लक्ष होत असल्याने   काही दिवसापुर्विच अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत टिळक भवण मुंबई येथे  काॅग्रेस पक्षात प्रवेश केला होता. विधासभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असताना त्यांना काॅग्रेसने लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली आहे. काॅग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिकारी यांचा त्यांना पुर्विपासुन साथ राहिली आहे. भाजपच्या तोडीस तोड उमेदवार दिल्याने लोकसभेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. 

कांबळेनंतर कामतांना संधी
उस्मानाबाद मतदार संघ असल्यापासुन १९६२ ते१९७१ पर्यत उदगीरच्या तुळशीराम कांबळे यांनी तिन वेळा लोकसभेच प्रतिनिधीत्व केल आहे. लातुर मतदारसंघ स्वतंञ झाल्यानंतरही  १९८४ ,१९८९ ,१९९१ अरविंद कांबळे उस्मानाबादचे लोकसभा मतदार संघाच तिन वेळा  प्रतिनिधीत्व केले आहेत. राखिव मतदार संघात सर्वाधिक काळात उदगीरकरांना संधी मिळाली आहे. मच्छिद्र कामंताच्चा माध्यमातुन पुन्हा उदगीरकारांना काॅग्रेसने संधी दिलि आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com