भाजप ही देशाला अन् शेतकऱ्यांना लागलेली कीड : अब्दुल सत्तार

भाजप ही देशाला अन् शेतकऱ्यांना लागलेली कीड : अब्दुल सत्तार

फुलंब्री (औरंगाबाद) : भाजप ही देशाला व शेतकऱ्यांना लागलेली कीड असून ही अळी वेळीच आटोक्यात आणायची गरज असल्याचे मत काॅंग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (ता.28) व्यक्त केले.

फुलंब्री तालुक्यातील खामगाव ( जि. औरंगाबाद)  येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने एल्गार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.कल्याण काळे, कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबाराव सोनवणे, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गंगाधर सोनवणे, माजी सभापती कचरु मैंद, जिल्हा बॅंकेचे संचालक पुंडलिक जंगले, राजेंद्र चव्हाण, मधुकर काथार, महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुनिता मारग, सविता पायगव्हाण, देविदास गाडेकर, आजीनाथ शेळके, रज्जाक शेख, शकुंतला सोनवणे, अब्दुल्ला शेठ, बाबुराव शिसोदे, राजेंद्र वाघ, रामकृष्ण मैंद, गणेश पवार, सिध्देश्वर भागवत, कारभारी घुमरे, काशीनाथ राकडे, खंडु सोनवणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.सत्तार म्हणाले की, बोंडअळमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. दुष्काळामुळे तो हवालदिल झाले असून त्याला धीर देण्याची गरज आहे. मात्र भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. बी- बियाणांचे भाव गगनाला भिडले असून खरिपात लागवड केलेले पीक संपूर्ण पणे वाया गेले आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करून एकरी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, त्यासाठी कुठलेही अर्ज न भरता आर्थिक मदत द्यावी.यासाठी काँग्रेस पक्षाकडून एल्गार यात्रेचे गावागावात आयोजन केलेले आहे. 

शेतमाल व दुधाला भाव नाही : डॉ.कल्याण काळे
भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची फरपट होत आहे. दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे. खरिपात लागवड केलेले पीक पावसाअभावी वाळून गेले आहे. शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत सरकार करायला तयार नाही. बोंडअळी, पीक विमा, कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे हे सरकार लबाडाचे आसल्याचे मत माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com