राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कॉँग्रेसचा प्रवेश, कोठे ते वाचा...

परभणी ः प्रभाग चौदा ‘अ’ च्या पोटनिवडणूकीत कॉँग्रेसच्या खान शहेनाजबी विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
परभणी ः प्रभाग चौदा ‘अ’ च्या पोटनिवडणूकीत कॉँग्रेसच्या खान शहेनाजबी विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
Updated on

परभणी ः महापालिकेच्या प्रभाग १४ (अ) च्या पोटनिवडणूकीत शुक्रवारी (ता.सात) झालेल्या मतमोजणीत कॉँग्रेस पक्षाच्या खान शहेनाजबी अकबरखान यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सय्यद महेबुब अली सय्यद अहेमद यांचा एक हजार ९०० पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. या पोटनिवडणूकीसाठी राज्यात व महापालिकेत सत्तेत असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत महाविकास आघाडी झाली नव्हती. त्यामुळे तिन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. गत पालिका निवडणूकीत या प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आले होते. परंतु, पोट निवडणूकीत मात्र कॉँग्रेसने या प्रभागात शिरकाव तर केलाच परंतु, महापालिकेत काठावर असलेले आपले संख्याबळ वाढवले आहेत. 

महापालिकेच्या प्रभाग १४ (अ) चे विद्यमान नगरसेवक सय्यद महेबुब अली स. अहेमद अली पाशा यांनी आपले इतर मागास वर्ग प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न सादर केल्यामुळे न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीसाठी गुरुवारी (ता.सहा) ४९.१३ टक्के मतदान झाले होते. 

अशी मिळाली मते 
कल्याण मंडपम मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.सात) मतमोजणी झाली. त्यामध्ये कॉँग्रेस पक्षाच्या खान शहेनाजबी अकबरखान यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सय्यद महेबुब अली सय्यद अहेमद पाशा यांचा एक हजार ९२८ मतांनी पराभव केला. खान यांना चार हजार २७९ मते मिळाली तर एस.एम.अली पाशा यांना दोन हजार ३५१ मते मिळाली. शिवसेनेचे सतिश खटके यांना ७०९ तर अपक्ष शबाना बेगम अलिमोद्दीन यांना ४० व सय्यद आबेद सय्यद उस्मान यांना ४८ तर नोटाला ६८ मते मिळाली. 

चार टेबलवर व चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी
कल्याण मंडपम येथे चार टेबलवर व चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. निर्वाचण अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी निकाल जाहिर केला. त्यांना सहाय्यक निर्वाचन अधिकारी तहसिलदार विद्याचरण कडवकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र जायभाये, नगर रचनाकार किरण फुटाणे, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहाय्यक आयुक्त मुसद्दीक खान,शिवाजी सरनाईक, अल्केश देशमुख, अदनान कादरी, राजाभाऊ मोरे, मुताहेर खान आदींनी सहकार्य केले.
 
विजयाबद्दल यांनी केले अभिनंदन
विजयाबद्दल श्रीमती खान यांचे आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, महापौर अनिता सोनकांबळे, उप महापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, सुनिल देशमुख, रविंद्र सोनकांबळे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, तालुकाध्यक्ष पंजाब देशमुख, अब्दुल हफीज चाऊस, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, इरफानुर रहेमान खान आदींनी अभिनंदन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com