औरंगाबाद शहरातून कॉंग्रेस हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्याची वाताहत झाली असून, शहरातून तर कॉंग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षासाठी सोडण्यात आला असून, "पश्‍चिम' बाबतही अद्याप अनिश्‍चितता आहे. तसेच जिल्ह्यातील पाच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस नऊपैकी फक्त दोनच जागा लढण्याची शक्‍यता आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने दोन याद्या जाहीर केल्या. त्यात जिल्ह्यातील एकमेव फुलंब्री मतदारसंघाचा समावेश आहे. माजी आमदार कल्याण काळे यांना फुलंब्रीतून उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी (ता. दोन) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद शहर पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता कॉंग्रेसकडे जिल्ह्यातील फक्त तीनच जागा राहण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला झुकते माप देण्यात आले. कॉंग्रेसकडे पश्‍चिम, सिल्लोड, फुलंब्री हे तीनच मतदार संघ दिले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कन्नड, पैठण, वैजापूर, गंगापूर आणि मध्य हे पाच मतदार संघ सोडले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जिल्ह्यात मोठी वाताहत झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 

दोनच जागा लढणार! 
पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असला तरी तो रिपब्लिकन डेमॉक्रॅटिक पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी कॉंग्रेसला अत्यल्प मते मिळाली होती तर दुसरीकडे रिपाइंचे रमेश गायकवाड यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. विजयाची सुतराम शक्‍यता नसल्याने कॉंग्रेसतर्फे उमेदवारी घेण्यास कोणी तयार नसल्याचे चित्र आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress expulsion