Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम

राम काळगे
Thursday, 16 July 2020

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

निलंगा, (जि. लातूर): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात  

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून बरी नव्हती त्यामुळे त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरणा टेस्ट घेण्यात आली ही टेस्ट पॉझिटिव्ह झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कोणाच्या संपर्कात आले नसतानाही कोरोणाचा संसर्ग झाला कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांचे वय अधिक असल्यामुळे कुटुंबाकडून यापूर्वीच काळजी घेण्यात आली होती.

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

त्यांना कोणत्याही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जाऊ दिले जात नव्हते. शिवाय ग्रामीण भागातील व शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आजही अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे विकासाची कामे घेऊन जात असतात परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लातूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोणा टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

अधिकृत माहीती जिल्हास्तरावरून देण्यात येणार आहे. डॉ. निलंगेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले असून कोरणा बाधित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. कोरोना संसर्गातून ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान लातूर येथून आरोग्य विभागानी ही माहीती अधिकृत असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Shivajirao Nilangekar Detect CoronaVirus Positive Latur News