काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

उमेश वाघमारे
Friday, 21 August 2020

राज्याच्या नगर विकास खात्याकडून काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शुक्रवारी (ता.२१) केला आहे.

जालना : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सतत नाराजीचे सुरू निघत आहेत. राज्याच्या नगर विकास खात्याकडून काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शुक्रवारी (ता.२१) केला आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

जालना शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधीची गरज आहे. मात्र, नगर विकास खात्याकडून काँग्रेसच्या आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकाना निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर इतर पक्षांच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात आहे,  असा भेदभाव का होतो, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली असून पक्षश्रेठींनाही याबाबत माहिती दिली आहे. ही बाब काँग्रेसच्या अकरा आमदारांसोबत झाली आहे, असा आरोप ही काँग्रेसचे आमदार कैसाल गोरंट्याल यांनी केला आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

आ. गोरंट्याल यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागले आहे. कॉंग्रेस आमदारांबद्दल होणार दुजाभाव पुन्हा दिसू लागला आहे.  

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Kailash Gorantyal accuses Mahavikas Aghadi government