नांदेड- 'व्हिजन 2019' अंतर्गत काँग्रेसचे चितंन शिबिराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

नांदेड-  गुरूवारी (ता.१९) शहरातील भक्ती लॉन्स येथे केले आहे. यात मराठवाड्यातील काँग्रेसचे पाच ते सहा हजार प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता नवा मोंढा मैदानात इमरान प्रतापगडी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आमदार अमरनाथ राजूरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार वसंतराव चव्हाण, महापौर शीला भवरे, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, विजय येवणकर, संतोष पांडागळे उपस्थित होते.                                               

Web Title: congress oragnised meeting in nanded for party workers