हिंगोलीला दिलासा; मंगळवारी ३३ रुग्णांची कोरोनावर मात तर नऊ पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी (ता.चार) ३३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने नऊ रुग्णांची भर पडली आहे. यातील २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकितस्क डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

हिंगोलीला दिलासा; मंगळवारी ३३ रुग्णांची कोरोनावर मात तर नऊ पॉझिटिव्ह

हिंगोली ः सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी (ता.चार) ३३ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने नऊ रुग्णांची भर पडली आहे. यातील २३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकितस्क डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील सहा एसआरपीएफ जवान तर सामान्य रुग्णालयातील २७ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये गाडीपुरा एक, इंदिरा नगर एक, नवा मोंढा दोन, आझम कॉलनी पाच, वंजारवाडा पंधरा, मेहराज कॉर्नर एक, जीप वसाहत एक, आदर्श नगर एक यांचा समावेश आहे. तसेच सोमवारी सात रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गाडीपुरा एक, विठ्ठल कॉलनी हिंगोली एक, नगर परिषद कॉलनी एक, पलटण हिंगोली एक अँटिजन तपासणीद्वारे पॉझिटिव्ह आला आहे. कासारवाडा एक, रेल्वे परिसर, चोंढी वसमत येथील प्रत्येकी एक असे सात रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत.

हेही वाचा - लॉकडाउनची घोषणा अन् खरेदीसाठी तोबा गर्दी, कुठे ते वाचा...

५३९ रुग्ण बरे
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकुण ७१८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५३९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आजघडीला एकुन १७१ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि एकूण आठ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हेही वाचा - सोयाबीन​ किडीचा प्रादुर्भाव झालाय, काळजी करु नका...

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर पाच रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायप्याप मशीनवर ठेवले आहे. आज रोजी एकूण २३ रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - ७१८ 
आजचे बाधित - नऊ 
आजचे मृत्यु - शून्य 
एकूण बरे - ५३९ 
पचार सुरु असलेले - १७१ 
एकूण मृत्यु - आठ 

संपादन ः राजन मंगरुळकर 

loading image
go to top