उसाचे हार्वेस्टर जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

औरंगाबाद - हार्वेस्टर मशिन जळाल्याच्या प्रकरणात उस्मानाबाद येथील ग्राहकाला 54 लाख 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश राज्य ग्राहक आयोगाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला. 

औरंगाबाद - हार्वेस्टर मशिन जळाल्याच्या प्रकरणात उस्मानाबाद येथील ग्राहकाला 54 लाख 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश राज्य ग्राहक आयोगाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला. 

पाडोळी (ता. कळम, जि. उस्मानाबाद) येथील संगीता टेकाळे यांनी ऊस कापण्यासाठी हार्वेस्टर मशिन खरेदी केले होते. त्यांनी हार्वेस्टर मशिनचा विमा युनायटेड कंपनीकडे काढलेला होता. 13 फेब्रुवारी 2014 ला उसाची कटाई करीत असताना हार्वेस्टर मशिनमध्ये अचानक आग लागली. यात मशिन पूर्णपणे जळाले. त्यामुळे टेकाळे यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. मात्र, कंपनीने दावा नामंजूर केला. त्यामुळे टेकाळे यांनी आयोगात तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आयोगाने ग्राहकाला 54 लाख 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला. शिवाय ही रक्कम नऊ टक्के व्याजासहित देण्याचेही निकालात स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून दहा हजार व दाव्याच्या खर्चासाठी पाच हजार रुपये द्यावेत, असे आदेशात नमूद केले. राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष एस. एम. शेम्बोले व सदस्य उमा बोरा यांनी हा निकाल दिला. अर्जदारातर्फे ऍड. अशोक पावसे यांनी युक्तिवाद केला. 

Web Title: Consumed sugarcane harvesters