esakal | जालना जिल्ह्यात संततधार पाऊस, दोन मंडळात अतिवृष्टी | Jalna Rain
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका कायम असून शुक्रवारी (ता.एक) रात्रीभर शहरासह जिल्ह्यात पावसाची संतधार सुरू होती.

जालना जिल्ह्यात संततधार पाऊस, दोन मंडळात अतिवृष्टी

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका कायम असून शुक्रवारी (ता.एक) रात्रीभर शहरासह जिल्ह्यात पावसाची संतधार सुरू होती. परिणामी शनिवारी (ता.दोन) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी २४.९० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर दोन मंडळात अतिवृष्टी झाल्याची ही नोंद झाली आहे. यंदा जिल्ह्यात जुलै महिन्यापासून जोरदार पावसला सुरवात झाली. मागील तीन महिन्यात सततच्या पावसाने (Rain In Jalna) खरीप पिकांचे मोठे (Rain Damage Crops) नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता.एक) रात्री पुन्हा जिल्ह्यात (Jalna) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने उरले सुरलेले खरीप पीक ही धोक्यात आले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात २४.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात दोन मंडळात अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली आहे.

हेही वाचा: औरंगाबाद शहराला मुसळधार पावसाने झोडपले; सुखना, खाम नदीला पूर

यामध्ये जालना तालुक्यातील रामनगर मंडळात ७५.५०, अंबड तालुक्यातील जामखेड मंडळात ७२.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जालना तालुक्यातील वाघ्रुळ मंडळात ६३, जालना ग्रामीण मंडळात ४५.८०, पाचनवडगाव मंडळात ४२.३०, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात ५१, रोहिलागड मंडलात ४०.३०, गोंदी मंडळात ४१.३०, वडीगोद्री मंडळात ४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर मंडळात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान जिल्ह्यात वार्षिक पावसाची सरासरी ही ६०३.१० मिलिमीटर आहे. मात्र, यंदा ता. एक जुनपासून आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल ११३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा तब्बल १६६.४० टक्के पाऊस झाला आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह; पाहा व्हिडिओ

loading image
go to top