चाकूरमध्ये सीमा सुरक्षा दलाचा दिक्षांत समारंभ

प्रशांत शेटे
शनिवार, 19 मे 2018

चाकूर : सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात ४३४ प्रशिक्षणार्थी जवानांचा दिक्षांत समारंभ चंदिगड येथील सीमा सुरक्षा दलाचे अप्पर महानिदेशक कमलनयन चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शनिवारी) संपन्न झाला. 

कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, छत्तीसगड यासह देशाच्या विविध राज्यातून सीमा सुरक्षा दलात भरती झालेल्या जवानांना येथील प्रशिक्षण केंद्रात ४४ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात आले, या जवानांना छत्रपती शिवाजी महाराज परेड मैदानावर पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली.

प्रशिक्षणा दरम्यान उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संतराम, मिलनसिंग, कुबेर बालाजी, पुनम किशोर, सुखदेव, रविंद्रकुमार, पृथ्वीराज नाईक, अजयकुमार, पांडेराज एस. बेजुबीनायर, तोशराम, हितेशकुमार सिन्हा, महेशकुमार, आर. राजा यांना अप्पर महानिदेशक श्री. चौबे यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे महानिरीक्षक संजीव भनोट, कमांडट संदीप रावत, उपकमांडट भरत सिंह, विजयकुमार, बिरेंद्रकुमार, अमित तेवतिया आदी उपस्थित होते.
 
Web Title: convocation ceremony border security force in chakur