मुदखेड ‘सीआरपीएफ’ प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारोह

mudhkhed.jpg
mudhkhed.jpg


मुदखेड, (जि. नांदेड)ः केंद्रीय पोलिस बल हे देशाच्या विविध बलांपैकी एक महत्वाचे बल असून या बलातील अधिकारी व जवान देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहत असतो. केंद्रीय पोलिस बलाचे योगदान देशसेवेसाठी मोठे महत्वाचे असून या केंद्रात प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या या तुकडीतील अधिकारी व जवानांनी आपल्या कार्याप्रती तत्पर राहुन देशसेवेसाठी स्वत:ला समर्पित करावे असे आवाहन मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये गुरूवारी सरळ सेवा भरतीमधील दुय्यम प्रशिक्षणार्थी अधीकाऱ्यांचा दीक्षांत समारोह समारंभ प्रसंगी या केंद्राचे पोलिस महानिरिक्षक राकेशकुमार यादव यांनी बोलताना केले.

अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण
गुरूवारी (ता.२०) रोजी सकाळी ‘सिआरपीएफ’ केंद्रातील क्वार्टर गार्डच्या मैदानावर सरळ सेवा भरती मधील ५१ व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी व जवानांचा दिक्षांत समारंभ संपन्न झाला. मुदखेड येथे सिआरपीएफचे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात देशभरातील प्रत्येक राज्यातुन नियुक्त झालेला सरळसेवा भरतीतील अधिकारी व जवानांना प्रशिक्षण दिले जाते. या दिक्षांत समारंभात (ता.१४) ऑक्टोंबर २०१९ पासून ते (ता.१८) फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५१ आठवड्याचे सरळसेवा भरतीतील विविध राज्यातील मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.


दिक्षांत समारभामधे प्रशिक्षणार्थी जवाना यांना केंद्राचे प्राचार्य बी.विरराजु यांनी देशसेवेप्रती शपथ दिली. उपस्थीत जवानांनी सिआरपीएफच्या ध्यास सलामी दिली. पोलिस महानिरिक्षक राकेशकुमार यादव यांच्या हस्ते प्रशिक्षणा दरम्यान विविध क्षेत्रात प्राविन्य मिळवलेल्या तीन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या मध्ये राजस्थानच्या पवन मिणा यांना ‘बेस्ट शुटर’, उतरप्रदेशच्या भावना कुमारीस ‘आऊटडोर बेस्ट’ तर तामिळनाडुच्या एस.दिपा हीस ‘ऑलराऊंड बेस्ट’ पुरस्काराने सन्मानि करण्या आले. पोलिस महानिरिक्षक राकेशकुमार यादव यांनी कार्यक्रम प्रसंगी या केंद्रातुन प्रशिक्षण पुर्ण करूण बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे त्यांच्या कार्याप्रती मनोबल वाढविण्यासाठी विविध कोर्स व देश सेवेप्रती महत्व, आपले कर्तव्य आणि जबाबदारीची आठवण करूण देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमास सिआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील कमांडन्ट पुरुषोत्तम जोशी, उपकमांडन्ट समीरकुमार राव, कपिल बेनिवाल, यु. सदाशिवम, प्रविण पाटील, सहाय्यक कमांडन्ट जगन्नाथ उपाध्याय, रुपेश कुमार, राजेंद्र कुमार, सत्यपाल सिंह यांच्या सह अधिनस्थ अधिनस्थ अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, प्रशिक्षक, जवान, मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमांडर तथा पोलिस निरिक्षक विनोद कुमार यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com