esakal | कोरोना : नांदेडचे ते पाचही रिपोर्ट निगेटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रोज नव्याने शहरात दाखल होत असलेल्या प्रवाशांमुळे नांदेड शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. (ता.१८ ते २२) मार्चपर्यंत पाच हजारापेक्षा अधिक प्रवाशी शहरात दाखल झाले आहेत. आतापर्यंत १५ संशयितांच्या स्वॉबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील १४ रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह प्राप्त झाले तर एक रिपोर्ट येणे अजून बाकी आहे.

 

कोरोना : नांदेडचे ते पाचही रिपोर्ट निगेटीव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : तीन ते चार दिवसांपासून पुणे, मुंबई, हैदराबाद येथून शेकडो प्रवाशी नांदेड शहरात दाखल होत आहेत. या दरम्यान शुक्रवारी (ता.२० मार्च) शहरात दाखल झालेल्या नागरिकांपैकी तीन व्यक्तीस कोरोना संशयित म्हणून शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांचे ‘स्वॉब’ घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता.२३ मार्च) त्या पाचही संशयितांचे अहवाल जिल्हा रूग्णालयाकडे प्राप्त झाले असून, त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

नांदेडकरांनी शहरात विनाकारण गर्दी करू नये, त्यापेक्षा घरात परिवारासोबत राहुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ‘कोरोना’ची पूर्व खबरदारी उपाययोजना म्हणून पुणे किंवा मुंबई शहरातून नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत. 

हेही वाचा - Video:अशोक चव्हाण म्हणाले, अत्यंत चिंताजनक....काय ते वाचा..
जुजबी लक्षणे आहेत?
रोज शेकडो नागरिक पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, हैदराबाद शहरातून नांदेडमध्ये दाखल होत आहेत. त्या सर्व नागरिकांना सौम्य ताप, सर्दी, खोकला, खशात खवखव होणे अशी काही जुजबी लक्षणे आहेत, काय याची तपासणी केली जात आहे. ज्यांना काही लक्षणे अढळुन आल्यास त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा - सोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...

लक्षणानुसार उपचार
यापुढे देखील शहरात दाखल झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असून, त्यांच्यात कोरोना आजाराची काही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या कक्षात ठेवून त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. नांदेड शहर व जिल्ह्यात आयसोलेशन व क्वॉरंटाईन वार्डची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात या विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
 

loading image
go to top