esakal | सोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


सोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...

सोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मोठी शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.२२) जनता कर्फ्युमध्ये नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला.

दरम्यान, घरात बसून अनेक नागरिक सोशल मीडियावर विदेशातील भारतीयांच्या मार्गदर्शक सुचनांसह कोरोनाविषयी गांभीर्याच्या पोष्ट व्हायरल केल्या. यामध्ये बीड जिल्ह्यातील राहुल वाघ वाघे बाभुळगाव (ता. केज), इटलीतील भारतीय दाम्पंत्य, त्याचबरोबर डॉ. सचिन कोते (पोलंड) यांच्या व्हिडिओ संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यु सहभाग घेतला. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील मुख्य शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात जमाबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी जनता कर्फ्यु दरम्यान नागरीक करमणुक कार्यक्रमांच्या तुलनेत सोशल मीडियावर अधिक व्यस्त होते. संपूर्ण जिल्ह्यातील गावेच्या गावे काल ओस पडली होती. रस्त्यावर कोणतीही वाहतूक दिसून आली नाही. 

सोशल मीडियावर व्यस्त 
रविवारचा कर्फ्यू यशस्वीपणे पार पडल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कर्फ्यू सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत वाढवला होता. सोमवारी सकाळी संपूर्ण शहरात लॉक डाऊन दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहे.

सोमवारी शहरासह जिल्ह्याभरात जमाबंदी आदेश लागू असताना शहरात दुचाकीवरुन चकरा मारणाऱ्या काही अतिउत्साही, हौशांना पोलिसांनी खाक्या दाखवून घरात पिटाळून लावले. जनता कर्फ्यु दरम्यान, घरात बसून अनेकांनी करमणुकीच्या कार्यक्रमांच्या तुलनेत सोशल मीडियावर कोरोना संसर्गाविषय खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती जाणून घेत प्राप्त झालेल्या पोष्ट इतरांना व्हायरल केल्या. 

 येथे क्लिक करा -Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा

राहुल वाघ यांचा संदेश 
राहुल वाघ वाघे बाभुळगाव (जि. बीड) यांचा व्हिडिओ संदेश अधिक प्रमाणात व्हायरल झाला. मोठी चूक अशी होती, की सुरुवातीच्या वेळी लोकांनी नेहमीप्रमाणे सरकारने सूचना देऊनही आपले काम चालू ठेवले, जीवन जगत राहिले आणि कामासाठी, करमणुकीसाठी आणि सुटीच्या काळासाठी वाटेल तेव्हा रस्त्यावर उतरले. मित्र आणि मेजवानीसाठी एकत्र जमले.

असे करणारा प्रत्येकजण चुकीचा होता आणि म्हणूनच ही वेळ आली! पण तुमच्याकडे विचार करायला अजून वेळ आहे. आपल्या देशात अशी वेळ येऊ नये, म्हणून मी आपणास विनवणी करतो की, सावधगिरी बाळगा, हा हास्य किंवा विनोद नाही. आपले पाल्य, प्रियजन, आपले आईवडील आणि आजी आजोबा यांचे रक्षण करा! हा रोग त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचा संदेश त्यांनी दिला. 

हेही वाचाआदेश धुडकावणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई

इटलीतील भारतीय दाम्पत्याचा संदेश 
इटली येथून एका दाम्पत्याने आम्ही घरातच असून देशातील सर्व शहरे लॉकडाऊन करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तुंसाठी घरातील केवळ एकाच व्यक्तीस वस्तू घेऊन येण्याची परवानगी असल्याचे सांगत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून घराबाहेर पडू नये, असा सल्ला व्हिडीओ कॉलद्वारे दिला.

त्याचबरोबर पोलंड येथून डॉ. सचिन कोते यांनी फेसबुक लाईव्हद्वारे कोरोनाचे गांभीर्य ओळखून शासनाच्या निर्देशाचे पालन करून आपण आपली सुरक्षा करणे, हाच एकमेव उपाय असल्याचा संदेश दिला. विदेशात असलेल्या भारतीयांनी कोरोनाचे गांभीर्य पटवून देत संसर्ग टाळण्यासाठी दिलेला सल्ला जमाबंदीसाठी लाभदायी ठरत आहे.