गरोदर महिलेसह दोन बालकांनी मिळविला काेरोनावर विजय

Marathwada Latur News
Marathwada Latur News
Updated on

उदगीर : शहरातील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेला एका गरोदर महिलेसह दोन बालकानी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या तिघांसह कोरोना मुक्त झालेल्या एकूण अकरा रुग्णांना शनिवारी (ता.6) घरी सोडण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून उदगीर शहर व परिसरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची साखळी तुटली आहे. येथून पाठवण्यात येणारे सर्व अहवाल निगेटिव्ह येत असल्याने उदगीरसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यातच येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण बारा रुग्णांपैकी अकरा रुग्णांना शनिवारी घरी सुटी देण्यात आली. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथील कोवीड रुग्णालयातून उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ दत्तात्रय पवार, तालुका आरोग्याधिकारी डॉ स्वाती सोनवणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, ग्रामीणचे निरीक्षक दिलीप वाघमारे, डॉ शशिकांत डांगे, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात आदी यावेळी उपस्थित होते.

आतापर्यंत एकून 72 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात उदगीर 69, जळकोट 2 तर अहमदपुर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी एकूण 47 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार संपल्याने घरी पाठवण्यात आले आहे. आत्तापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आता एकूण बारा रुग्ण उपचार घेत होते. यापैकी आता अकरा जणांना सुट्टी देण्यात आली आहे.केवळ एक रुग्ण येथील शासकीय वसतिगृहात उपचारार्थ दाखल आहे. कोवीड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

देवर्जनच्या सहा रुग्णांना सुट्टी...
या अकरा रुग्णांमध्ये सर्वात जास्त म्हणजे देवर्जन येथील सहा रुग्णांचा समावेश त्यानंतर कासराळ येथील तीन रुग्ण आणि एक व  अहमदपूर येथील एका रुग्णांचा समावेश आहे . या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने यांना सुट्टी देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com