कोरोना : रक्त संकलानासाठी गोदावरी धावली

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : कोरोनासारख्या जग हादरवून सोडणाऱ्या रोगाच्या परिस्थितीमध्ये जो तो आपल्यापरीने मदत करत आहे. येथील गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील आणि खासदार हेमंत पाटील यांनी राज्यशासनाच्या रक्तदान करण्याच्या आवाहनाला साद देत कौटुंबिक रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली.

मागील काही दिवसांपासून जगात कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडाला असून संपूर्ण जग या रोगाचा सामना करत आहे. देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी  १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वसामान्य, मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल होत असून त्यांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. जो तो आपआपल्या परीने मदत करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी, प्रशासनाशी सुसंवाद साधत आहेत. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यात रक्ताचा तुटवडा असून केवळ सात दिवस पुरेल एवढेच रक्तसाठा शिल्लक असल्याचे सांगितले होते. यासाठी जनतेने रक्तदान करावे असे आवाहन केले. 

कौटुंबिक रक्तदान शिबीर -
आरोग्य मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील आणि सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी कौटुंबिक रक्तदान शिबीराचे शनिवारी आयोजन केले होते. विशेष दात्यांची गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. रक्तदानासाठी श्री. व सौ. पाटील यांनी कार्यकर्त्यांना वेळ ठरवून दिली होती.  त्यानुसार रक्तदान करण्यासाठी अनेक तरुण पुढे आले होते.

रक्तदान करण्याचे आवाहन

सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे नियोजन केले होते. त्याला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात रक्तसंकलन करून हुजुर साहेब रक्तपेढीला देण्यात आले. यावेळी राजश्री पाटील यांनी राज्यातील जनतेला सुद्धा रक्तदान करून रक्तदान करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे या कामी तुकाई प्रतीष्ठान, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑफ सोसायटीमधील महिला कर्मचारी सोबतच गोदावरी फाउंडेशन, गोदावरी इंटरनॅशनल, पब्लिक स्कुल, गोदावरी स्किल डेव्हलपमेंटमधील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उस्फुर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com