video - ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’

video - 'Brothers Understanding Lockdown Do Not Disturb' Nanded News
video - 'Brothers Understanding Lockdown Do Not Disturb' Nanded News

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात देखील नांदेड शहरातील विविध चौक, मुख्य रस्ते आणि नाक्यावर अनेक नागरीक दुचाकी, चार चाकी वाहनांमधुन ये जा करत असल्याने रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. यातील बहुसंख्य हौशी विनाकारण फिरताना दिसत असून, ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’ असे पोलिसांना म्हणावे लागत आहे.

कोरोना विषाणूमुळे जग हादरले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर न फिरता घरातच बसून रहावे, यासाठी संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ केले आहे. अत्यावश्‍यक असेल तरच बाहेर पडण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे. त्याची अमलबजावणीही सुरु असून, काही हौशींमुळे मात्र पोलिसांचा ताण वाढत आहे. अनेकजण हे काहीच काम नसताना देखील रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे लोकांचे बाहेर फिरण्यासाठीचे बहाणे ऐकुण पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील हैराण आणि हातबल होत आहेत.

नांदेड शहरातील आयटीआय चौकात पोलीसांचा फौजपाटा असताना देखील नको ते बहाणे करुन लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकमेकांकडे बघुन लोक घराबाहेर पडण्याची हिम्मत करत आहेत; नव्हे कोरोनाला अमंत्रणच देण्याचे काम तर करत नाहीत ना? असा सवाल देखील आहोरात्र सेवा देणारे डॉक्टर आणि पोलीस प्रसानाकडून उपस्थित केला जात आहे.

‘कोरोना’ व्हायरसमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी २१ दिवस अर्थात (ता.१४ एप्रिल २०२०) लॉक डाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात तरी नागरीकांनी घरी बसून स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी म्हणून हा लॉकडाऊन करण्यात आला. तरी देखील नांदेडकर मात्र चक्क पोलीसांना उल्लु बनवत रुग्णालयाची जुनी फाईल हातात घेऊन रुग्णालयात जात असल्याची बनवा बनवी करत दिवसभर बाईकवरुन गावभर फिरण्यासाठी रस्‍त्यावर गर्दी करत आहेत.

येथे क्लिक करा - जिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा

लॉकडाऊनच्या काळात सरकारने अत्यावश्यक सेवा सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने, व्यापारी, बाजारपेठ, हॉटेल, मॉल, गर्दीची ठिकाणे बंदची घोषणा केली आहे. त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळत असला तरी, टवाळखोरांकडे मात्र दिवस कसा घालवायचा म्हणून भलतच खुळ सुचत असून, घरातल्या व्यक्तीच्या इन्सुलन्स गोळ्यांचे पॅकेट, अस्थमाचा स्ट्रॉ, रुग्णालयाची जुनी फाऊईल दाखवून पोलीस प्रशासनाला उल्लु बनवले जात आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक हिरमुसले

प्रत्यक्षात पोलीसांना देखील या मागची सत्यता माहिती आहे. परंतु अत्यावश्यक सेवेचे कारण दाखवणाऱ्यांना कुठलीच अडकाठी न करता त्यांना पुढे मार्गस्थ करण्यासाठी सहकार्य केले जात आहेत. मात्र यातील अनेकजन रुग्णालय किंवा मेडीकलचा बहाणा करुन अवश्यकता नसताना देखील रस्त्यावरुन फिरताना दिसून येत आहेत. यांना लॉकडाऊनचा अर्थ कळला नाही असेही नाही. मात्र सर्व काही कळुन देखील उगीच घरी बसवत नाही म्हणून अत्यावश्यक कामाची शक्कल लढवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com