esakal | ‘कोरोना’ रिलीफ फंडासाठी सरसावले मदतीचे हात
sakal

बोलून बातमी शोधा

jadhav

शेतकरी पुत्र पवन जाधव पाटील यांनी दिले एका महिन्याचे उत्पन्न 

‘कोरोना’ रिलीफ फंडासाठी सरसावले मदतीचे हात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून देशभर १४ एप्रिलपर्यंत जनता संचारबंदी बरोबर विविध उपाययोजना या रोगांवर मात देण्यासाठी येत असून कोरोना आपत्काल फंडासाठी तालुक्यातील लासिना येथील पवन जाधव पाटील यांनी दुग्ध व्यवसायातून मिळणारे एक महिन्याचे उत्पन्न हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाठविले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्‍तरावर विविध उपाययोजना सुरू असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. त्‍यासाठी लागत असलेल्या खर्च आपआपल्या पध्दतीने बरेच उद्योगपती, खेळाडू, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, देवस्थान, अधिकारी, कर्मचारी असे मंडळी मदत देत आहेत. संकटाच्या काळात सर्वांनी शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचे पालन करून जनता संचारबंदी काळात बाहेर निघू नये घरीच थांबावी. तसेच जनता संचारबंदी काळात शेतमजूर, इतर मजूर, गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांना आपआपल्या परीने अन्नधान्याची व इतर मदत सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा - ‘या’ तालुक्यात १२३१ जण ‘होम क्वारंटाइन’

एक महिन्याचे उत्पन्न दिले मदतीसाठी 
आवाहनाला साथ देत हिंगोली तालुक्‍यातील लासीना येथे शेतकरी व दुध विक्रेते पवन जाधव पाटील यांनी त्‍यांना दुधविक्रीपासून व शेतातून महिण्याला मिळणाऱ्या उत्‍पन्नातून तीस हजार रूपयांचा निधी कोरोना रिलीफ फंडासाठी दिला आहे. या फंडासाठी सर्वांनी आपआपल्या परिने सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी इतरांना केले आहे. 

हेही वाचा - विनाकारण फिरु नका, वाहने जप्त करू : डॉ. विपिन

बाळापूर येथे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
आखाडा बाळापूर ः जिल्हा काँग्रेस समिती व संजय बोंढारे पाटील मित्र मंडळाच्या वतीने रविवारी (ता.२९) गरजूंना अन्नधान्याचे वाटप कुसुमताई चव्हाण सभागृहात करण्यात आले. मजुरांची होणारी अडचण लक्षात घेता जिल्हा काँग्रेस समिती व संजय पाटील बोंढारे मित्रमंडळाने मजुरांच्या भोजनाचा प्रश्न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे, सरपंच जिया कुरेशी, पोलिस निरीक्षक विकास थोरात, बाजार समिती सभापती दत्ता बोंढारे, ग्रामपंचायत सदस्य अरुण सूर्यवंशी, अजहर पठाण, माजी सभापती शेषराव बोंढारे, चेअरमन पांडुरंग बोंढारे, मोहम्मद गौस, शहबाज कुरेशी यांच्या उपस्थितीत मजुरांना धान्य वाटप करण्यात आले. गावातील सुमारे शंभरपेक्षा अधिक मजुरांना एक महिनाभर पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आल्याने मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली.

बोथी येथे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
कळमनुरी तालुक्‍यातील बोथी येथे खासदार राजीव सातव यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिश पाचपुते यांच्या हस्ते सोमवारी गरजू व्यक्तींना गहू, तांदूळ व साबनाचे वाटप करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य दिलीप डुकरे, मारोती डुकरे नंदकुमार बोथीकर, लक्ष्मण खोकले, परसराम डुकरे, पोलिस पाटील संतोष बोथीकर, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, नितिन डुकरे, नारायण काळे, राजु बोथीकर, तोलबा डुकरे, दादाराव डुकरे, बबन वागतकर, साहेबराव डुकरे , भीमराव सावळे, गंगाधर डुकरे आदींची उपस्थिती होती.