esakal | खायला अन्न अन् पिण्यासाठी पाणी नाही... मराठवाड्यातील वाड्या-तांड्यांवरील स्थिती

बोलून बातमी शोधा

लातूर
खायला अन्न अन् पिण्यासाठी पाणी नाही... मराठवाड्यातील वाड्या-तांड्यांवरील स्थिती
sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाडी-तांडे असून लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामूळे कुंटूब प्रमुखांना कुंटूब जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक तांड्यावरील बंजारा समाजातील नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही त्यामूळे त्यांचे लॉकडाउनकाळात हाल होत आहेत.

बंजारा समाजाचा मुख्य व्यवसाय ऊसतोड करणे, जनावरे पाळणे हा आहे. ऊस कामगार लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी परत आला आहे. एका कुंटूंबात चार ते पाच जण असतात. त्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त असते. काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. कुंटूबाला दररोज दोन तीनशे रुपये पोट भरण्यासाठी लागतात. पंरतू खिसाच रिकामा असल्याने खाण्यासाठी काय खरेदी करायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे.

हेही वाचा: ‘मरीजों के दर्द के सामने हमारी तकलिफ बहुत छोटी’

दरम्यान गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अनेक संस्था पुढे येऊन वाडी- तांड्यावरील जनतेच्या पोटाला हातभार लावला होता त्यामुळे कुंटूबांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता. पंरतू आता दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमध्ये मदत करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. अन्ना बरोबरच अनेक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. एक घागर पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे. एक किलोमीटर जाण्यासाठी अंगात अवसान तर पाहिजे आणि पोटातच काही नसल्याने अंतर गाठणेही अवघड आहे.

हाताला कामही नाही. खाण्यासाठी घरात अन्न नाही. पिण्यासाठी पाणी नाही त्यामूळे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे. शासनाने मोफत रेशन देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप गोरगरींबाना रेशन मिळाले नाही. त्यामूळे अशा गरजू लोकांना तातडीने रेशन देऊन जगण्यासाठी बळ देण्याची गरज आहे. अनेक संस्था सामाजिक कार्य करतात आशा वाडी तांड्यावरच्या गोरगरीब कुंटूबाला आर्थीक आधार दिल्यास त्यांना जगण्याचे बळ मिळणार आहे.

हेही वाचा: अवघ्या दहा दिवसांत उभारले व्हेंटिलेटर, ऑक्सिजनने सुसज्ज शंभर बेडचे हॉस्पिटल

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने सर्व कुंटूब घरात आहे. शिल्लक असलेले घरातील अन्न संपले आहे. पिण्यासाठी पाणी नाही. शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे कुंटूबावर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत केल्यास आम्हाला जगण्यासाठी आधार मिळणार आहे.

-संजय आडे, शिवाजीनगर तांडा (माळहीप्परगा, ता.जळकोट)