esakal | ‘मरीजों के दर्द के सामने हमारी तकलिफ बहुत छोटी’

बोलून बातमी शोधा

doctors

‘मरीजों के दर्द के सामने हमारी तकलिफ बहुत छोटी’

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: संकटकाळात डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी दिवसरात्र सेवा देत आहेत. कोरोनामुळे देशासह राज्यातसुद्धा डॉक्टरांचे बळी गेले. मात्र, त्याची पर्वा न करता डॉक्टर आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. सध्या रमजान महिना सुरु असून या महिन्यात कोविड केअर सेंटरमधील अनेक डॉक्टर, मेडीकल स्टाफ रोजे ठेऊन आपली सेवा देत आहे. सहरपासून तर इफ्तारपर्यंत तब्बल १४ तासांचे अंतर असते. मात्र ‘मरीजो के दर्ज के सामने हमारी तकलीफ बहुत छोटी है. मरिजो के इलाज में पुरा दिन कब गुजर जाता है इसका पता ही नही चलता’ हे उद्‍गार आहेत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे.

वर्षभरापासून रुग्णांवर उपचार-

डॉ. शेख शकील (मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर): वर्षभरापासून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देत आहे. आता सहा महिन्यांपासून मेल्ट्रॉन येथे माझी ड्युटी आहे. इतर कोविड केअर सेंटरच्या तुलनेत येथे रुग्णांचा ओढा आहे. येथे माझी येथे दोन दिवस मॉर्निंग, दोन दिवस इव्हीनींग तर दोन दिवस नाईट ड्युटी असते. यासोबत माझ्याकडे कार्डीयाक ॲम्ब्युलन्सची सुद्धा जबाबदारी असून रुग्ण जास्त गंभीर असेल तर त्याला घाटीत रेफर केले जाते. त्या रुग्णासोबत मला घाटीपर्यंत जावे लागते. आता पूर्ण रोजे ठेऊन मी कर्तव्य बजावत आहे. पीपीई किट घालून रुग्णांची नियमित तपासणी करतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थोडा त्रास होत असला तरी रुग्णांच्या वेदनेसमोर तो काहीच नाही.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीचे अजून नऊ प्रकल्प उभारणार

रुग्णांच्या उपचारावरच असते लक्ष-

डॉ. सोहेल सय्यद (देवगिरी हॉस्टेल कोविड केअर सेंटर): दहा महिन्यांपासून मी कोविड रुग्णांवर उपचार करतोय. माझी देवगिरी महाविद्यालयातील हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये सकाळी दहापासून ड्युटी असते. येथील सेंटर मध्ये ३०० बेडची व्यवस्था असून दररोज रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. आमच्याकडे प्रत्येक शिफ्टमध्ये दोन डॉक्टर आहेत. रोजा असला तरी रुग्णांच्या औषधोपचारावर सर्वाधिक लक्ष असल्याने दिवस कसा जातो हे कळत नाही. आता पीपीई किटसह साहित्याची सवय झाली आहे. रुग्णांवर उपचार करणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. नमाजसह इतर गोष्टी ऑन ड्युटीच असतात.

हेही वाचा: ना रुग्णालय, ना व्हेंटिलेटर तरी गंभीर रुग्ण ‘रिकव्हर’

पूर्ण दिवस रुग्णांच्या सेवेत-

डॉ. साजीद अख्तर (पद्मपुरा कोविड केअर सेंटर): एक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने मी कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देत आहे. माझी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ड्युटी असते. तसेच ऑनकॉल सुद्धा रहावे लागते. मी दररोज पीपीई किट घालून रुग्णांची तपासणी करतो. उन्हाळ्यात याचा त्रास असला तरी ते करणे आवश्‍यक आहे. रुग्णांच्या प्रकृतीकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागते. रोजा असला तरी माझे संपुर्ण लक्ष रुग्णांकडे ठेवत असल्याने रोजा जास्त जाणवत नाही. रुग्णांचे उपचार करत असतांना त्यांच्याशी नियमित संवाद साधत असतो.