कोरोना : रिकव्हरी रेटमध्ये राज्यात कोल्हापूर प्रथम तर परभणी दुसऱ्यास्थानी

गणेश पांडे
Tuesday, 23 June 2020

कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा हा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या स्थानावर कोल्हापूर जिल्हा आहे. या यादीत सर्वात खाली म्हणजे ३५ व्या स्थानावर वाशिम जिल्हा आहे.

परभणी : राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतांना परभणी जिल्ह्यातील एक आशादायक बातमीसमोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा हा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या स्थानावर कोल्हापूर जिल्हा आहे. या यादीत सर्वात खाली म्हणजे ३५ व्या स्थानावर वाशिम जिल्हा आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. विशेष करून मोठी शहरातील लोक या संसर्गाला सर्वाधिक संख्येने बळी पडत आहेत. यात पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात तर कोरोनाचा कहर दररोजच सुरु आहे. परंतू दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही आता वाढले आहे. राज्यातील ३५ जिल्ह्याची आकडेवारी आरोग्य विभागाने जाहिर केली आहे. त्यात कोल्हापुर हा जिल्हा रिकव्हरी रेटमध्ये सर्वात पुढे आहे. या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९०. ४ इतक आहे. दुसऱ्या स्थानावर परभणी जिल्हा असून या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ८७.१ इतका आहे. 

हेही वाचा -  Video - बोगस बियाणेप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक, कुठे ते वाचा...

रिकव्हरी रेटचे आकडे बोलतात

सध्या परभणी जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सहा रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तीसऱ्या स्थानावर हिंगोली (८४. ९), चौथ्या स्थानावर वर्धा (७८. ६), पाचव्या स्थानावर गडचिरोली (७८), सहाव्या स्थानावर सिंधुदूर्ग (७७. ३), सातव्या स्थानावर चंद्रपुर (७५. ९), आठव्या स्थानावर अहमदनगर (७४. ६), नवव्या स्थानावर उस्मानाबाद (७३. ९), दहाव्या स्थानावर बीड (६९. ९), आकराव्या स्थानावर सातारा (६९. ५), बाराव्या स्थानावर यवतमाळ (६९. १), तेराव्या स्थानावर गोंदिया (६८. ३), चौदाव्या स्थानावर रत्नागिरी (६६. ७), पंधराव्या स्थानावर धुळे (६५. ८), सोळाव्या स्थानी भंडारा (६५. ३), सतराव्या स्थानी बुलढाणा (६५), आठराव्या स्थानी लातूर (६४. १), एकोनिसाव्या स्थानी अकोला (६३. ७), विसाव्या स्थानी जालना (६३. ३), एकेविसाव्या स्थानी अमरावती (६३), बाविसाव्या स्थानी नागपुर (६२. ९), तेविसाव्या स्थानी नांदेड (६२. १), चौविसव्या स्थानी रायगड (६०. ९), पंचविसव्या स्थानी औरंगाबाद (५५. ३), सविसव्यास्थानी नाशिक (५५. २), सत्ताविसव्या स्थानी सांगली (५४. ६), अठ्ठाविसव्यास्थानी पुणे (५४.३), एकोनतीसव्यास्थानी जळगाव (५२. ६), एकतीसव्यास्थानी मुंबई (५०. ४), बत्तीसव्यास्थानी सोलापूर (४६. ७), तेहतिसव्यास्थानी नंदुरबार (४३. ४), चौतिसव्यास्थानी ठाणे (३९. ३), पस्तीसव्यास्थानी पालघर (३०. ३) व छत्तीसव्यास्थानी वाशिम (२३. ९) हा रिकव्हरी रेट आहे.

मराठवाड्यात परभणी अव्वलस्थानी

कोरोना विषाणु संसर्गीत रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात मराठवाड्यात परभणी अव्वलस्थानी आहे. यात दुसऱ्या स्थानावर हिंगोली, तिसऱ्या उस्मानाबाद, तीसऱ्या बीड, चौथ्या लातूर, पाचव्या जालना, सहाव्या नांदेड तर सातव्यास्थानी औरंगाबाद जिल्हा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Kolhapur ranks first and Parbhani second in the state in recovery rate parbhani news