esakal | उस्मानाबाद : शुक्रवारची नमाज घरीच केली अदा, टाळली गर्दी

बोलून बातमी शोधा

Corona News In Osmanabad District

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराने हजारो लोकांचा मृत्यू झाला. सुरवातीला चीनच्या वुहानमध्ये आढळलेला हा कोरोना जगातील अनेक देशात वाऱ्यासारखा पसरला आहे.

उस्मानाबाद : शुक्रवारची नमाज घरीच केली अदा, टाळली गर्दी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधव शंभर टक्के प्रतिसाद देत परिसरातील हजारो मुस्लीम नागरिकांनी आजची (शुक्रवार) महत्त्वाची नमाज मस्जिदीमध्ये अदा न करता आपल्या घरातच नमाज अदा करून, सरकारच्या नियमांचे पालन केले. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी नमाजसाठी होणारी गर्दी आज मात्र झालीच नाही. त्यामुळे ऐरवी हाऊस फुल्ल असणारे परिसरातील मस्जिदे ओस पडल्याचे चित्र आज दिसून आले. 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराने हजारो लोकांचा मृत्यू झाला. सुरवातीला चीनच्या वुहानमध्ये आढळलेला हा कोरोना जगातील अनेक देशात वाऱ्यासारखा पसरला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, इराण, जर्मनी, उत्तर कोरिया, सौदी अरब, इग्लंड, रशिया या सोबत भारतातही या रोगाने शिरकाव केला आहे. देशभरात आत्तापर्यंत 729 लोकांना कोरोनाची लागण झाली असून, 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 135 रुग्ण आढळले असून, त्यापैकी पाच जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. सुरवातीला पुण्यात पहिला रुग्ण आढळला यानंतर मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर,  सांगली, नवी मुंबई आढळत गेले.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच गेली तरी देखिल या आजारातून जवळपास 18 जण बरे झाले आहेत. हे आपल्या आरोग्य यंत्रणेचा एक प्रकारे मोठा  विजयच आहे. शहरी भागातील कोरोनाचे लोण ग्रामीण भागात पसरत आहे. विदेशातून आणि शहरी भागातून आलेल्या उमरगा तालुक्यातील जवळपास 29 जणांना आयशोलेसन वार्डात  ठेवण्यात आले. अनेकांना कारोंटाइन करण्यात आले. त्यापैकी 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. 22 जणांचा रिपोर्ट निगेटीव आल्याने अनेकांनी सुटकेचा  श्वास घेतला आहे.

परिसरातील आलूर, बेळंब तांडा, मुरुम, दाळींब या गावात परदेशातून व मुंबई, पुण्यातून आलेल्या नागरीकांचे स्वॅब पाठवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांत  मोठ्याप्रमाणात भीती निर्माण झाली आहे. त्यांच्या संपर्कात कोणकोण आली यांची देखिल तपासणी केली जात आहे. संपुर्ण देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. संचार बंदीमुळे  गावातील रस्ते निर्मनुष्य आहेत. इतिहासात पहिल्यांदाच सरकारला प्रार्थना स्थळे बंद करण्यासारखा संसर्गजन्य रोग राज्यात पहिल्यांदाच आला आहे. यादी, प्लेग, हत्तीरोग, बर्डफ्ल्यू, स्वाईनफ्ल्यू, गँस्ट्रो असे अनेक रोग आले मात्र प्रार्थना स्थळे बंद झाली नव्हती. गर्दी थांबविण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा प्रसार झपाटयाने  होत असल्याने ग्रामीण भागातील लोक चिंतीत आहे. परिसरातील सर्वच मस्जिदीमध्ये लॉकडाऊन पाळण्यात आला.

सोशल मीडियावर शेजारच्या कर्नाटक राज्यातील एका मस्जिदीमध्ये नागरिक नमाज अदा करण्यासाठी आले असता कर्नाटक पोलीस शेकडो मुस्लीम नागरीकांना काटीने फोडून काढल्याची व्हीडिओ क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने  मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असून याचा मुस्लिम बांधवाकडू सर्वत्र निषेध व्यक्त होत असून, दोषी पोलिसावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कोरोना आणि पोलिसांच्या  धास्तीने परिसरातील मस्जिदे ओस पडल्याचे चित्र दिसुन आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला 31 मार्चपर्यंत प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.

या  परिसरातील मुस्लीम बांधव प्रतिसाद देत शुक्रवारची महत्त्वाची नमाज आपआपल्या घरात पडून कोरोनाचे संकट लवकर टळु दे जनजीवन पूर्वपदावर ये दे या आजारापासून सर्वांना वाचव  अशी प्रार्थना अनेक मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे केली. 

संबंधित बातम्या - 
Coronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा... 

Coronavirus : बालकांना कोरोना होतो का, चीनमध्ये काय झाले? डॉक्टर म्हणतात...