बेडगा येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

अविनाश काळे
शुक्रवार, 29 मे 2020

गेल्या दोन दिवसापासुन त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. कोरोनाने घेरल्याने त्यात  मधूमेह, रक्तदाब असे आजार होते. डॉक्टर्सच्या टिमने ऑक्सीजनचा पुरवठ्यासह अत्याधुनिक उपकरणाचा आधार देत प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला कोरोनाबळी ठरला आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) -  येथील उपजिल्हा रुग्णालयात (कोविड रुग्णालय) उपचार सुरू असलेल्या तालुक्यातील बेडगा येथील साठ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा शुक्रवारी (ता.२९) रात्री पावणेदहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला कोरोनाबळी ठरला आहे.

या बाबतची माहिती अशी की, १६ मे रोजी मुंबई येथून दोन ट्रॅव्हल्स मधून बेडगा येथील तीस व्यक्ती आल्या होत्या. त्यात साठ वर्षीय व्यक्ती आपल्या नातेवाईकासह आला होता. उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करून गावाच्या शाळेत व्यवस्था करण्यात आली होती. साठ वर्षीय व्यक्तीला ताप येण्याचे लक्षणे सुरू झाल्याने शिवाय त्याला मधूमेहाचा त्रास होऊ लागल्याने २१ मे रोजी  तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता, अहवाल मात्र २५ मे रोजी आला होता त्यानंतर त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

गेल्या दोन दिवसापासुन त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. कोरोनाने घेरल्याने त्यात  मधूमेह, रक्तदाब असे आजार होते. डॉक्टर्सच्या टिमने ऑक्सीजनचा पुरवठ्यासह अत्याधुनिक उपकरणाचा आधार देत प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. दरम्यान शुक्रवारी रात्री सात पासुन प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टर्सनी उस्मानाबादच्या सिव्हील रुग्णालयाला नेण्यासाठी तयारी जवळपास पूर्ण केली होती मात्र अचानकपणे त्याची प्राणज्योत मालवली.   शनिवारी (ता. ३०) अंत्यविधी होईल असे वैद्यकिय अधिक्षक डॉ.पंडीत पुरी यांनी सांगितले.

कुटुंब हादरले

जेष्ठ नागरिकाच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब हादरले आहे. पत्नी व नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दोघावर याच रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर मयत नागरिकाचा मुलगा संशयित कक्षात आहे. त्याचा पहिल्या स्वॅबचा अहवाल इनक्लूसिव्ह आल्याने शुक्रवारी (ता. २९) दुसरा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient dies in Umarga