उस्मानाबाद जिल्ह्यात २६३ जणांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू

2coronavirus_63
2coronavirus_63

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी (ता.२३) २६३ जणांना कोरोनाची लागण झाली असुन एका रुग्णाचा बळी गेला आहे. एकाच दिवसात १८० रुग्णांना बरे करुन घरी पाठविले आहे. त्यामुळे बरे होण्याचा आकडा आता ७ हजार ७५९ वर पोचला आहे. आजच्या एका मृत्युने मृत्यु दर २.९४ टक्के इतका झाला आहे.


जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ५५ हजार २७ इतक्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ८५५ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह होण्याची टक्केवारी १९.७३ टक्के इतकी आहे. सध्या जिल्ह्यामध्ये पाच हजार ८७० एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर एक हजार ४८ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.  बुधवारी आलेल्या २६३ पैकी ९६ जण आरटीपीसीआरद्वारे व १६७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात सापडले आहेत.

तालुक्यामध्ये ९७ जणांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामध्ये २७ जण आरटीपीसीआरद्वारे व ७० जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुळजापुर येथील २१ जणांना बाधा झाली असुन त्यामध्ये आठ जण आरटीपीसीआरद्वारे व १३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा २६ जणाना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दहा जण आरटीपीसीआरद्वारे व १६ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कळंब येथे ४२ रुग्ण सापडले असुन त्यात १३ जण आरटीपीसीआरद्वारे व २९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा येथे कोरोनाचे २४ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये १२ जण आरटीपीसीआरद्वारे तर १२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भुम तालुक्यात २५ जण बाधित झाले आहेत. त्यामध्ये दहा जण आरटीपीसीआरद्वारे, तर १५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. वाशी येथे वीस जण बाधित झाले आहेत, तर लोहारामध्ये आठ जण बाधित झाले आहेत.  


 कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १०८५५
बरे झालेले रुग्ण - ७७५९
उपचाराखालील रुग्ण - २७७७
एकुण मृत्यु - ३१९
आजचे बाधित - २६३

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com